विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षण ही काळाची गरज- शुभंकर मुखर्जी

KCE News

जळगाव प्रतिनिधी । आजचे युग हे आधुनिक संगणकीय युग आहे. संगणकामुळे आज जग जवळ आले असून शिक्षणात मोठी क्रांती ही संगणकामुळे घडून आली आहे, सर्व शिक्षा अभियानांतर्गत दुर्गम भागातील मुलांना शिक्षणाचा लाभ मिळावी. यासाठी डिजिटल शिक्षण ही काळाची गरज असल्याने भावी शिक्षकांनी दोन पावले पुढे टाकत शिक्षणातील बदलते प्रवाह लक्षात घेऊन स्वतःला अपडेट करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन इस्ट्रीजिओन एज्युटेक सर्विसेस (ओपीसी) प्रा.लि. कंपनीचे ट्रेनिंग मॅनेजर शुभंकर मुखर्जी यांनी केले.

के.सी.ई. सोसायटी संचालित शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालयातर्फे भावी शिक्षकांसाठी “डिजिटल क्षमता” यावर 13 ते 18 जानेवारी या सहा दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह सर्टिफाइडचे एज्युकेटर अमित कुमार तर अध्यक्षस्थानी शिक्षण शास्त्र व शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. आर. राणे उपस्थित होते. मू. जे. महाविद्यालयाचे ऑटोनोमस इन्चार्ज एस., एन. भारंबे, साने गुरुजी विद्या प्रबोधनी खिरोदा तसेच उमवीचे माजी अधिष्ठाता डॉ. साहेबराव भुकन, जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख संदीप केदार उपस्थित होते. मान्यवरांनी दीपप्रज्वलन व सरस्वती मातेचे प्रतिमेचे पूजन तसेच माल्यापर्ण करून कार्यशाळेचे उदघाटन केले. प्रास्ताविकात प्रा. केतन चौधरी यांनी कार्यशाळेविषयी माहिती देताना म्हटले की, ६ जानेवारी पासून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे भावी शिक्षकांसाठी स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

वर्कशॉप केवळ थेरोटीकल नसून नव्हे तर प्रॅक्टीकल वर आधारित आहे. यासाठी महाविद्यालयातर्फे 13 ते 18 जानेवारी या कालावधीत या सहा दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. भावी शिक्षकांनी अद्ययावत शिक्षण प्रणालीचा अवलंब केला पाहिजे हा यामागचा हेतू आहे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.सूत्रसंचालन व आभार प्रा.डॉ. सुनीता नेमाडे यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षण शास्त्र व शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्रा. रंजना सोनवणे, प्रा. कुंदा बाविस्कर, प्रा. डॉ वंदना चौधरी, प्रा.डॉ स्वाती चव्हाण, प्रा अंजली बन्नपुरे, ग्रंथपाल एम. एम. वनकर, प्रा. प्रवीण कोल्हे, प्रा. पंकज पाटील संगणक- लिपिक मोहन चौधरी, जनसंवाद व पत्रकारिता विभागाच्या प्रा केतकी सोनार, संजय जुमनाके आदी उपस्थित होते.

Protected Content