दुकान फोडून ४५ हजाराची रोकड लांबविली

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील नवीन बी.जे.मार्केटमधील असलेले गुरूनानक ट्रेडर्स दुकान मध्यरात्री फोडून दुकानातून ४५ हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना समोर आली आहे. याबाबत सोमवारी ३० ऑगस्ट रोजी रात्री जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रदीप नानकराम रामचंदाणी (वय-४०) रा. सिंधी कॉलनी,जळगाव असे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शहरातील नवीन बी.जे.मार्केटमधील बेसमेंटमध्ये त्यांचे गुरूनाना ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. २७ ऑगस्ट रोजी त्यांनी दुकान नेहमीप्रमाणे रात्री ८ वाजता बंद घरून घरी निघून गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी संधीचा फायदा घेतल बंद दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत गल्ल्यातील ४५ हजार रूपयांची रोकड लांबविली. हा प्रकार सोमवारी २९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आला. त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून माहिती दिली.

त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात रात्री १०.३० वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सलीम तडवी करीत आहे.

Protected Content