विद्यापीठात झालेल्या मुलाखतीत चार विद्यार्थ्यांची निवड

nmu new

 

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षातंर्गत कॅनस्टोर्स (Canstores) या कंपनीद्वारे घेण्यात आलेल्या परिसर मुलाखतीत आज दि. 27 ऑगस्ट रोजी चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, कॅनस्टोर्सतर्फे विद्यार्थ्यांसाठी परिसर मुलाखतीचे आयोजन विद्यापीठात करण्यात आले होते. कॅनस्टोर्स हे एक अँड्रॉइड अॅप्स (Android App) असून या अॅप्सद्वारा आपल्याला आपल्या जवळपासच्या दुकानातील सेल व सवलतींची माहिती सहजपणे उपलब्ध होऊ शकते. या अॅप्सच्या माध्यमातून शॉपिंग सुकर होण्यास मदत होते. विद्यापीठातील व्यवस्थापन विभागातील एमबीएच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती कॅनस्टोर्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रसाद बी.झवर यांनी घेतल्या. यावेळी व्यवस्थापनशास्त्र विभागाचे समन्वयक डॉ.आर.जे.सरदार यांनी मुलाखतीचे व्यवस्थापन केले. मुलाखतीत चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर, प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी, केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाचे समन्वयक डॉ. भूषण चौधरी यांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content