वेतनवाढ व इतर मागण्यांसाठी भारतीय सुरक्षा रक्षक कामगार सेनेतर्फे आंदोलन (व्हिडीओ)

WhatsApp Image 2019 08 27 at 5.19.06 PM

जळगाव, प्रतिनिधी | शिवसेना प्रणीत भारतीय सुरक्षा रक्षक कामगार सेनेतर्फे सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यलयासमोर सुरक्षा रक्षकांना दरमहा किमान वेतन १८,००० /- हजार रुपये देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी अध्यक्ष सचिन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली  आंदोलन करण्यात आले.

सहाय्यक कामगार आयुक्त यांना दिलेल्या निवेदनातकरण्यात आलेल्या मागण्या पुढील प्रमाणे : धुळे जिल्हा अंतर्गत जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळा मध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना खाकी रंगाचा गणवेश देण्यात यावा व मंडळाकडुन दरवर्षी सुरक्षा रक्षकांना गणवेश, हिवाळी स्वेटर, पावसाळी रेनकोट, चामडी बुट, पावसाळी गमबुट, काठी इत्यादी वस्तु देण्यात याव्यात. जिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असलेले धुळे व नंदुरबार या जिल्हातील सुरक्षा रक्षकांना ८ ते ९ महिन्याचे थकित वेतन तातडीने मिळावे, मंडळातील सुरक्षा रक्षकांचा दरमहा वेतनातुन २५०/- ते ३००/-रुपये टिडिएस स्वरूपात कपात केला जातो. तो तातडीने बंद करून व कपात केलेला टिडिएसची रक्कम सुरक्षा रक्षकांना परत करण्यात यावी.मंडळातील सुरक्षा रक्षकांचे नोंदणी क्रमांक (रजिस्ट्रेशन) लवकरात लवकर करण्यात यावे व मंडळाचे नोंदणीकृत ओळखपत्र हे मराठी भाषा मध्ये देण्यात यावे. मंडळातील सुरक्षा रक्षकांचे वेतन दरमहा दहा तारखेच्या आत करण्यात यावे.

Protected Content