यावल तालुका शिक्षक-शिक्षकेतर पतपेढीच्या निवडणुकीत सहकार गटाचा विजय

यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या पतपेढीची निवडणूक शांततेत पार पडली असुन यात सहकार गटाने नऊ संचालक निवडून आले आहेत.

मतदान संपल्यानंतर झालेल्या मतमोजणीत सर्वसाधारण ड गटातून किरण वासुदेव झांबरे तर अनुसूचित जाती जमाती बद्दल आतिश शामराव मेघे हे विजयी झाले.पतपेढीत एकूण सहा गटापैकी पाच गट बिनविरोध निवडून आले असुन, एका गटासाठी ही निवडणूक घेण्यात आली. यात किरण वासुदेव झांबरे दत्त हायस्कूल चिखली व गजानन अशोक सुरवाडे शारदा विद्या मंदिर न्हावी ड गटात समोरासमोर झालेल्या लढतीत सर्वात जास्त३१ मते घेऊन किरण झांबरे विजय झाले झाले तर प्रतिस्पर्धी उमेदवार गजानन अशोक सुरवाडे यांना ८ मते मिळत त्यांचा पराभव झाला. दुसरी लढत अनुसूचित जाती जमाती संवर्गामधून आतिश शामराव मेघे यांना १८२ मते मिळवत भरघोस मतांनी विजयी झाले. तर प्रतिस्पर्धी उमेदवार आनंद जाधव यांना ९ मत मिळाल्याने त्यांचा पराभव झाला.

उरलेल्या पाच गटामधून अ गटात श्री भुवनेश्वरी विद्यामंदिर मनवेल येथील दीपक नामदेव पाटील ,ब गटात यावल शहरातील पी.एम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे नितीन बारी ,क गटात ज्योती विद्यामंदिर सांगवी येथील सतीश युवराज सरोदे यांची आदी च बिनविरोध निवड झाली आहे.

दरम्यान, इ गटातून मुन्सिपल हायस्कूल फैजपूर येथील राजेंद्र चौधरी तर ई गटात माध्यमिक विद्यालय पाडळसा येथील राजेंद्र बराटे हे बिनविरोध निवडून आले आहे. वरील सर्व उमेदवार हे सर्वसाधारण गटातील असल्याने यामध्ये फक्त एका जागेसाठी ड गटात होती.

पूर्ण तालुक्यातून लढाईच्या असलेल्या जागा या पैकी दोन महिला राखीव मध्ये श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चुंचाळे येथील शारदा सुधीर चौधरी, व न्यू इंग्लिश स्कूल भालोद येथील मनीषा नेहते, तर ओबीसी राखीव डॉ.दिवाकर खंडू चौधरी माध्यमिक विद्यालय डांभुर्णी येथील जितेंद्र अर्जुन फिरके, तर भटक्या जाती जमाती मधून प्रभात विद्यालय हिंगोणा माध्यमिक विद्यालयाचे जितेंद्र रूपा बिरपन यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

रविवारी झालेल्या निवडणुकीत लगेच मतमोजणीची प्रक्रिया पार पडली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के.व्ही.पाटील, सुनिल मोरे,नंदकिशोर मोरे,प्रशांत साळवे, विजयसिंग पाटील, निर्णय अधिकारी म्हणून प्रक्रिया पार पाडली. सर्व विजय उमेदवारांचे सहकार पॅनलचे मार्गदर्शक जळगाव जिल्हा पतपेढीचे अध्यक्ष एस.डी भिरुड तसेच पतपेढीचे संचालक सिद्धेश्वर वाघुळदे, भुसावळ पतपेढीचे संचालक चेतन तळले, अश्विनी कोळी, चेतना चौधरी, प्रशांत सोनवणे,मुख्याध्यापक जयंत चौधरी,डी.व्हि.चौधरी,व्हि.जी.तेली, नितीन झांबरे, जयंत नेवे,समाधान भोई,डी.व्ही.पाटील,मनोज गाजरे, उमाकांत महाजन,पी.एस. नेमाडे, के.जी.चौधरी,ललीत सुपे,मनोज फालक,अजित पाटील ,गणेश पाटील, कैलास चौधरी, यांनी परिश्रम घेतले.

Protected Content