अमळगाव विकासो निवडणुकीत शेती सेवा पॅनलचा विजय

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पाच गावांचा विस्तार असलेल्या तालुक्यातील सर्वाधिक मोठ्या अमळगाव विकास कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत आ.अनिल पाटलांच्या नेतृत्वातील शेती सेवा पॅनलचा दणदणीत विजय झाला असून या पॅनलने 13 पैकी तब्बल 11 जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

सर्वाधिक मोठी आणि आमदार अनिल पाटील यांच्या हिंगोने गावाचा समावेश असलेली ही सोसायटी असून यात अमळगांव, खेडी खुर्द, खेडी सिम, मेहेरगांव ,दोधवद, हिंगोणे इ गावे समाविष्ट आहेत,यामुळे संपुर्ण तालुक्याचे याकडे लक्ष लागून होते,तसेच निवडणूक देखील चुरशीची झाली दि 26 रोजी मतदान होईन त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी करण्यात आली,यात विरोधी पॅनल ला फक्त 2 जागांवर समाधान मानावे लागले,विजयी उमेदवारांचे आ. अनिल पाटील यांनी अभिनंदन केले.

हे आहेत विजयी उमेदवार

ईंजी. गिरीश पाटील अमळगांव (जनरल), मिलिंद पाटील अमळगांव (ओबीसी), राजेंद्र पाटील खेडी सिम (जनरल), रावसाहेब पाटील खेडी खुर्द  (जनरल ), डॉ.संजय भाऊराव पाटील खेडी सिम (जनरल), ज्ञानेश्वर आनंदा शिंदे खेडी खुर्द  (एनटी) प्रभावती पाटील दोधवद  (महिला राखीव), हिंमतराव गटलू पारधी अमळगांव  (एस सी/एस टी), प्रवीण पाटील हिंगोणे (जनरल), सुभाष पाटील अमळगांव (जनरल), संजय चौधरी अमळगांव (जनरल).

सदर पॅनलच्या विजयासाठी अमळगाव येथील उदय पाटील, नंदकिशोर पाटील, महेंद्र पाटील (भटुभाऊ), भोई,अॅड.व्ही.आर.पाटील, परमार वकील, लक्ष्मण पाटील,  निलेश पाटील, उल्हास पाटील, मुरलीधर पाटील, भिकन दाजी, सुरेश पाटील, रविंद्र पाटील, हंसराज पाटील, राहुल पाटील, घनश्याम पाटील, बापू चौधरी, छोटू चौधरी, राकेश चौधरी, शिवाजीराव चौधरी, भगवान पाटील, दिपक पाटील, अक्षय पाटील, वंदना हंसराज पाटील, भैय्यासाहेब पाटील, खेडी येथील पद्माकर पाटील, ज्ञानदेव पाटील (सरपंच), बाळू पाटील, हिरालाल पवार, प्रभाकर पाटील, विलास शिंदे,  प्रा.श्याम पवार, प्रल्हाद पाटील, एम.एस.पाटील, गंभीर शिंदे, भास्कर पाटील, आबासाहेब पाटील, मेहरगाव येथील एस.व्ही.पाटील , घनश्याम पाटील, प्रवीण पाटील , पिरण बापू, भिकण आबा, दिलीप टेलर, रामभाऊ पाटील, सी.जी.भाऊसाहेब,हिंगोणे येथील बापू पाटील, दादु पाटील प्रभाकर संतोष पाटील, बंडू पाटील, कोळी पोलिस पाटील, दोधवद येथील अॅड.व्हि.आर. पाटील,  रवा पाटील, सरपंच भोई भुरा, गवरलाल भोई, पिरु राजपुत,अँड दीपेन परमार, धोंडु पाटील  तसेच अमळगांव, खेडी खुर्द, खेडी सिम, मेहेरगांव ,दोधवद, हिंगोणे येथील सर्व मतदार आणी ग्रामस्थ बंधु भगिनी यांनी सहकार्य केले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Protected Content