मोटरसायकल चोरटा जेरबंद ; पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांची कामगीरी

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर)येथून दि. २३ जून रोजी दिवसाढवळ्या घरासमोर लावलेली मोटरसायकल चोरीस गेल्याची घटना घडली होती. दरम्यान, पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांनी तत्परता दाखवत चोरट्यास अटक केली आहे.

 

पिंपळगाव (हरेश्वर) सह परिसरात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. पिंपळगाव येथील रमेश दत्तात्रय वाघ यांची मोटार सायकल एम. एच. – १९ – सी. पी. २२५६ ही दि. २३ जुन रोजी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरासमोरून चोरून नेली होती. या प्रकरणी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिवसाढवळ्या मोटरसायकल चोरीस जात असल्याच्या तक्रारी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनमध्ये करण्यात येत असल्याने पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी पोलिस नाईक रवींद्र पाटील, पोलिस काॅन्स्टेबल रणजीत पाटील, पंकज सोनावणे, मनोज बडगुजर, संभाजी सरोदे यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने संशयित चेतन उर्फ सोनू भोई यास पिंपळगाव (हरेश्र्वर) येथून सदर गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून रमेश वाघ यांची मोटरसायकल क्रं. एम. एच. १९ – सी. पी. २२५६ ही शिवना येथून हस्तगत केली आहे. सदरच्या कारवाईमुळे मोटरसायकल चोरट्यांचे धाबे दणाणले असुन पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

Protected Content