मेहरुणमध्ये वृद्ध, दिव्यांग मतदारांना विचार वारसा फाउंडेशनने केली मदत

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव लोकसभा निवडणुकीसाठी शहरातील अनेक मतदान केंद्रांवर मतदान अंतिम टप्प्यात आले आहे. मेहरूण भागात विचार वारसा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी वृद्ध व दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांवर आणण्यासाठी मदत केली.

मेहरूण भागातील रामेश्वर कॉलनी, मास्टर कॉलनी, स्वामी समर्थ चौक भागात विचार वारसा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून मतदान केंद्रांवर जाऊन वृद्ध व दिव्यांग मतदारांना ने आण करण्यासाठी मदत केली. यामध्ये फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख, आशिष राजपूत, ऋषी राजपूत, आकाश तोमर, मयुर डांगे, संकेत म्हस्कर, चेतन राजपूत, राहुल राजपूत, नकुल निकम आदींनी मदत केली.

Protected Content