भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण

शेअर करा !

नवी दिल्ली प्रतिनिधी ।  देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी सकाळी व्यंकय्या नायडू यांची कोरोनाच चाचणी घेण्यात आली होती. त्याचा अहवाल रात्री प्राप्त झाला असून ते पॉझिटिव्ह आले आहेत. याबाबत व्यंकय्या नायडू यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. 

नायडूंना कोणतीही लक्षणं नाहीत. त्यांची प्रकृती ठीक असून घरीच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. व्यंकय्या नायडू यांच्या पत्नीची टेस्ट घेण्यात आली असून त्याची चाचणी निगेटिव्ह आली. त्यासुद्धा सेल्फ आयसोलेट झाल्या आहेत.

 

 

 

 

 

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!