Home Cities जळगाव विहिंपचे ललित चौधरी अयोध्या येथे रवाना

विहिंपचे ललित चौधरी अयोध्या येथे रवाना


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अयोध्या येथे होत असलेल्या ऐतिहासिक प्राण प्रतिष्ठा सोहळा साठी देशभरातून विविध प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रण आलेले आहे. जिल्हाभारतील काही संत सुध्दा उपस्थित असणार आहेत.

विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांत सहमंत्री ललित चौधरी हे अयोध्या येथे रवाना झाले आहेत. त्या आधी विहिंपचे जिल्हाध्यक्ष हरीश मुंदडा याचे घरी सर्व जिल्हा कार्यकारणी सोबत चर्चा केली व त्याच ठिकाणी ललित चौधरी यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. देवगिरी प्रांताचे प्रतिनिधी म्हणून ललित चौधरी हे उपस्थित असणार आहेत.

इतके वर्षे केलेला संघर्ष पासून आज हा सुवर्ण क्षण बघण्याचा योग आल्याचे ललित चौधरी यांनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी विहिंपचे प्रांत मंत्री योगेश्वर गर्गे, विहिंपचे माजी अध्यक्ष सुरेंद्र मुंदडा, जिल्हामंत्री देवेंद्र भावसार, सहमत्री ह.भ.प. संदीप महाराज, राजेंद्र गांगुर्डे, डॉ. हितेंद्र गायकवाड, हरीश कोल्हे , भुषण क्षत्रिय, ललित खडके यांच्यासह आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound