Home क्राईम जळगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण ; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल

जळगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण ; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल

0
157

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी २ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता समोर आली आहे. याबाबत मंगळवारी ३ मार्च रोजी मध्यरात्री १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. दरम्यान, सोमवारी २ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी ही घरी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. हा प्रकार समोर आल्यानंतर तिच्या पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उल्हास चऱ्हाटे हे करीत आहे.


Protected Content

Play sound