भुसावळ संतोष शेलोडे । भुसावळ शहराच्या पाणीपुरवठ्यासह अनेक गाव ज्याच्यावर विसंबून असतात त्या हतनूर धरणातील पाणीसाठ्याची सध्या बिकट अवस्था असून धरणात आता फक्त मृत साठा शिल्लक राहिला आहे.
गेल्या वर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे आधीच हतनूर धरण भरले नव्हते. यातच आता कडाक्याच्या उन्हामुळे तीव्र बाष्पीभवन होत असून पाणी साठा लक्षणीयरित्या कमी झाला आहे. यातच धरणातील जिवंत पाणी साठा नष्ट झाला असून फक्त मृत साठा उरला आहे. १९९२ नंतर अशी भयंकर अवस्था ओढवली आहे हे विशेष. हतनूरमध्ये केवळ १३३ दलघमी मृत साठा शिल्लक आहे. यातही गाळाचे प्रमाण लक्षात घेता फक्त २४.६७ दलघमी क्षेत्रातच साठा आहे. सध्या धरणाच्या खालील भागात असणार्या भुसावळ शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. येथे आधी एक आवर्तन सोडण्यात आले असून ते तीन-चार दिवसांमध्ये समाप्त होऊ शकते. यामुळे भुसावळकरांसाठी आवर्तन अत्यावश्यक आहे. आता जिवंत पाणी साठा नष्ट झाल्यामुळे मृत साठ्यातूनच आवर्तन सोडण्यात येईल हे स्पष्ट झाले आहे.
पहा : कोरडे पडण्याच्या मार्गावर असणार्या हतनूर धरणाची सद्यस्थिती.