व्यवहार झाल्यावर पासबुकमध्ये पडताळणी करा – डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे 

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘जेष्ठ नागरिकांनी ऑन लाइन व्यवहार करतांना सजग राहावे, शक्यतो व्यक्तिश: बँकमध्ये गेल्यावरच व्यवहार करावा असे केले तर ऑनलाइन फसवणूकीच्या गोंधळापासून आपणास सुरक्षित राहता येईल.’ असे प्रतिपादन भुसावळ विभागाचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी आज केले.

‘ॐ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान’ संचलित वासुदेव जेष्ट नागरिक संघाच्या ६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘जेष्ठ नागरिक – ऑनलाइन व्यवहार –फसवणूक’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आयपीएस आतिश कांबळे, अध्यक्ष धनराज पाटील, उपाध्यक्ष प्रभाकर झांबरे, उपस्थित होते. आयपीएस आतिश कांबळे यांनी याबाबत जेष्ठ नागरिकांमध्ये जनजागृती करत महत्वपूर्ण बाबी सांगितल्या.

यात बँकमध्ये जातांना नेहमीचा रिक्षाचालक सोबत असावा. घरातील एखादा व्यक्ती सोबत असल्यास उत्तम. बँक कधीही आपला ओटीपी, पिन आदींबद्दल विचारणा करत नाही. अनोळखी क्रमांकासोबत बोलणे टाळावे. ऑनलाइन पारितोषिक, रोख रक्कम आदी अमिषाला बळी पडू नका. फसवणूक होत आहे असं वाटल्यास लगेच संबंधित बँक/पोलीस प्रसासनाकडे संपर्क करावा. बँकेमध्ये व्यवहार झाल्यावर पासबुकमध्ये त्याची पडताळणी करा. यासह इतर बाबी सांगत डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी जेष्ठ नागरिकांना त्यांचे मुलगा, मुलगी सून, आणि जावई उतारवयात योग्य प्रकारे काळजी घेत नसतील तर त्याबद्दल कायदेशीर तरतूद विविध उदाहरणे देत सांगितल्या.

यावेळी सोनू भिरूड, अजराम चौधरी, यशवंत वारके, प्रकाश पाटील, प्रमोद बोरोले, रामण भोगे, पुंजो भारंबे, लोटू फिरके, भानुदास पाटील, मधुकर पाटील, प्रभाकर शिंपी, मधुकर पाटील, आबा मालवीया आदी जेष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रकाश पाटील आणि आभार प्रदर्शन प्रभाकर झांबरे यांनी केले.

“युवकांनी आपल्या जेष्ठ नागरिकांसाठी संघ काढणे, वाढवणे आणि सतत कार्यक्रम घेणे हि नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. यामुळे उतारवयातील एकाकीपणा नक्कीच कमी होण्यास मदत होणार असल्याचे” डॉ.नितू पाटील यांनी सांगितले.

Protected Content