गुटखा वाहतूक करणारे वाहन पकडले; ९ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त !

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीगाव शहरातील तिरंगा पुलावरून अवैधरित्या गुटखाची वाहतूक करतांना चाळीसगाव शहर पोलीसांनी कारवाई करत ९ लाख २४ हजारांची गुटखा जप्त करण्यात आले. ही कारवाई बुधवारी १३ मार्च रोजी रात्री १० वाजता करण्यात आली. या कारवाईत पोलीसांनी एकाला अटक केली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय गुलाब कोतकर वय २४ रा.तिरंगा पुलाजवळ चाळीसगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

चाळीसगाव शहरातील तिरंगापुलावरून अवैधरित्या गुटखाची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार पथकाने बुधवार १३ मार्च रोजी रात्री १० वाजता तिरंगा पुलावर सापळा रचत वाहन क्रमांक (एमएच १९ ईए ३९५८) क्रमांकाचे वाहन पकडले. त्यात गुटख्याच्या १८ गोण्या आढळून आला. पोलीसांनी वाहनासह ९ लाख २४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी, पोहेकॉ पंढरीनाथ पवार, पोना भूषण पाटील, भटू पाटील, मनोज चव्हाण यांनी केली. पुढील तपास पीएसआय योगेश माळी, राकेश पाटील आणि कल्पेश पगारे हे करीत आहे.

Protected Content