विल्हाळे येथील वरुण गोशाळा मंडवारा यांचा निस्वार्थ गोसेवेचा वसा

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील विल्हाळे शिवारातील खंडाळा रोड वरील वरूण गोशाळा हे वरुण मंडवारा या गोसेवकाचे निस्वार्थ पणे गोमातेची सेवा होत असलेलं एक निर्सगरम्य ठिकाण आहे.

२१ एकरामध्ये भव्य अशी गोशाळा तयार असून सदर गोशाळा तयार करण्यासाठी त्यांना सात वर्ष लागले आहे. येथे सर्व प्रकारच्या गोमातेची निस्वार्थपणे सेवा केली जात आहे. शेतीचे कोणतेही उत्पन्न न घेता या ठिकाणी चारा सुद्धा शेतात पेरला जात आहे.तसेच त्यांचे ट्रॅक्टर, जेसीबी यांच्या माध्यमातून मिळालेल्या पैश्यातून गोमातेसाठी चारा उपलब्ध केला जातो.आणि प्रत्येक गायीची वैदयकिय तपासणी सुद्धा करण्यात येते.
गायीचे दूध सुद्धा काढून विकले जात नाही फक्त वासरांना पाजले जाते.

परिसरात झाडे लावून निर्सगरम्य वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे कन्टेनरपासून उत्कृष्ठ प्रकारच्या घराची याठिकाणी निर्मिती केली आहे. सोलर सिस्टीम व्दारालाईट व्यवस्था असून संपूर्ण परिसराला तारेचे कुंपण केले आहे. वरूण ताराचंद मंडवारा हे या गोशाळेचे संचालक असुन त्यांनी स्वखर्चाने हे तयार केले आहे.कोणाकडूनही देणगी न घेता तयार केलेली ही गोशाळा आहे.या संस्थेचे वृद्धाश्रम चालविण्याचा मानस आहे. गोशाळेची देखभाल पंडीत भालेराव हे करतात. वेळोवेळी या गोशाळेत भजन किर्तन कार्यक्रम होत असतात. एकदा तरी परिसरातील नागरीकांनी या गोशाळेला भेट दयावी असे, आवाहन वरूण मंडवारा यांनी केले आहे.

Protected Content