जळगावात स्व.निखिल खडसेंच्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रम

social programs for the birth anniversary of Nikhil Khadse

जळगाव प्रतिनिधी । माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांचे चिरंजीव स्व. निखील खडसे यांच्या जयंतीनिमित्त नाथ फाऊंडेशन तर्फे विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आज आयोजन करण्यात आले असून श्रीराम प्राथमिक विद्यालय मेहरुण येथे होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला. तसेच सायंकाळी रेल्वे स्टेशन रोड येथील गोरगरीब लोकांना तसेच अंध-अपंग मुलांना अन्नदान व सुमारे 172 ब्लॅकेटचे वाटप करण्यात आल्या आहेत.

यावेळी भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष कंवरलाल संघवी, मा. नगराध्यक्ष बंडुदादा काळे, नाथ फाऊंडेशन जळगावचे अध्यक्ष अशोक लाडवंजारी, सुभाष शौचे, दिपक फालक, दिलीप माहेश्वरी, अरुण शिरसाळे, सुनिल माळी, डॉ.अभिषेक ठाकुर, सुशील हसवाणी, डॉ. मिलिंद चौधरी, जमिल शेख, हाजी युसुफ, ललित शर्मा, प्रविण कुलकर्णी, भगवान सोनवणे, विनोद मराठे, संजय लुल्ला, गोटु चौधरी, फारुक तांबोळी, युसुफभाई पिंजारी, सुनिल काळे, धिरज काबरा, अकील शेख व इतर मान्यवर उपस्थित होते.

Protected Content