धरणगाव नगरपरिषदेत जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव नगर परिषदेत जागतिक महिला दिनानिमित्त एक महत्त्वाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते झाले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्वच्छतेच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात आले.

यात घनकचऱ्याचे विलगीकरण – १६ हजार डस्टबिनचे वाटप सर्वप्रथम, घनकचऱ्याचे ओला व सुका असे विलगीकरण सुनिश्चित करण्यासाठी घरोघर डस्टबिन वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. नगरपरिषदेतर्फे ८ हजार कुटुंबांना प्रत्येकी २ डस्टबिन दिले जाणार आहेत, ज्यामुळे कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व वाढवले जाईल. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र शाखा धरणगाव यांनी CSR फंडाद्वारे मदत केली आहे.

थकबाकी मुक्त बचत गट – महिलांचे आर्थिक योगदान कार्यक्रमात ‘थकबाकी मुक्त बचत गट’ उपक्रमाचे यश संपादन करणाऱ्या १९ महिला बचत गटांचा सन्मान करण्यात आला. या गटांनी एकत्र येऊन नगरपरिषदेची मालमत्ता कर आणि पाणीपट्टी अशी एकूण १४ लाख १९ हजार ३९७ इतकी थकबाकी भरली आहे, हे एक मोठे यश मानले जात आहे. महिलांच्या आर्थिक साक्षरतेत झालेल्या या प्रगतीला महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल वितरण प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १३० घरकुल पूर्ण करणाऱ्या चार लाभार्थींचा यावेळी प्रतिनिधिक सन्मान करण्यात आला. एकूण १३५ घरकुलांसाठी ३.३१ कोटी रुपयांचा निधी नगरपालिकेद्वारे अदा करण्यात आला आहे. यामुळे शहरी गरीबांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडला आहे.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 अंतर्गत ट्रॅक्टर लोकार्पण स्वच्छतेच्या दृष्टीने एक मोठा पाऊल म्हणून, स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 अंतर्गत नवीन ट्रॅक्टरचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे कचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया अधिक कार्यक्षम होईल. ‘बरतन बँक’ उपक्रमाचा गौरव नगरपरिषदेच्या स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत RRR करिता ‘बरतन बँक’ या उपक्रमाला गौरव प्रदान करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे स्वच्छतेला चालना देणे आणि नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करणे.