शिवसेनाप्रमुख, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने यावल येथे विविध कार्यक्रम

यावल प्रतिनिधी | शहर व तालुका शिवसेना, युवासेना यांच्या वतीने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयती निमित शहरासह तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्यात संपन्न झाले.

यावल शहर व तालुका शिवसेना, युवासेना यांच्या वतीने रविवार, दि. २३ जानेवारी रोजी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयती निमित शहरासह तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्यात संपन्न झाले. सकाळी १० वाजता शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शिवसेनाप्रमुख, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन करण्यात आले.

सकाळी ११ वाजता बोरावल रस्त्यावरील आदिवासी वस्तीवरील गरजू व गरिब नागरिकांना अन्नदानाचे पाकिटे व कपडे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख मुन्ना पाटील, तालुका प्रमुख रविंद्र सोनवणे, शरद कोळी, आर के चौधरी, शहरप्रमुख जगदिश कवडिवाले, युवासेना शहर अधिकारी सागर देवांग, पप्पू जोशी, अजहर खाटीक, कडू पाटील, संतोष धोबी, किरण बारी, सुनिल बारी, सागर बोरसे, भरत चौधरी, संतोष वाघ, सुधाकर धनगर, शाखाप्रमुख शकिल पटेल, प्रदिप वानखेडे, सारंग बेहेडे, हमीद पटेल, सतिश पाटील, राजेश श्रावगी, फारुख पटेल, राजू पाटील, पराग कोळी, गजानन कोळी, राहुल कोळी, अनिल कोळी, मयुर धोबी आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.​

Protected Content