Home Cities जळगाव शनिवारी अग्रवाल समजातर्फे अग्रेसेन जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम

शनिवारी अग्रवाल समजातर्फे अग्रेसेन जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम

0
125

 

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील अग्रवाल समाजातर्फे अग्रसेन जयंती उत्सवानिमित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी २१ सप्टेंबर रोजी महिलांविषयी कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

अग्रवाल महिला मंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात स्पर्धा हॉटेल क्रेझी होम, आकाशवाणी चौक येथे होतील. उद्घाटन दुपारी २ वाजता सुशीला नंदकिशोर पटवारी आणि राधादेवी नंदकिशोर चौधरी यांचे हस्ते होणार आहे. उद्घाटनानंतर महिलांसाठी भिंतीवर टांगण्याच्या शोभेच्या वस्तू बनविणे, मटकी सजवणे, गाय-वासराची विधिवत पूजा मांडणे, मुखवास बनवणे ह्या स्पर्धा विविध वयोगटांमध्ये होणार आहेत. तसेच सर्व महिलावर्गासाठी “लौट आया बचपन” आणि मजेदार गेम्स कंट्री हंट आणि बॅटन रेस घेण्यात येणार आहे. महाविद्यालयीन तरुण-तरुणींसाठी “काश्मीरमधून कलम ३७० हटविणे किती गरजेचे आहे” या विषयी निबंध स्पर्धा घेतली जाणार आहे. सर्व स्पर्धेतील विजेत्यांना शनिवारी २८ रोजी होणाऱ्या शोभायात्रा समारोपाच्या कार्यक्रमात पारितोषिक देवून गौरविले जाणार आहे. स्पर्धेसाठी महिलांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन अध्यक्षा पूजा अग्रवाल, सचिव सोनल अग्रवाल यांनी केले आहे.


Protected Content

Play sound