वंचित लाभार्थींना स्वस्त धान्य मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

mukyamtri

मुंबई प्रतिनिधी । स्वस्त धान्य पासून वंचित असलेल्या राज्यातील 50 लाख कुटुंबांना पुन्हा सार्वजनिक वितरण व्यवस्थेत लाभ सुरू करावा आशी मागणी विरोधीपक्ष नेता धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

निवेदनात म्हटल्याप्रमाणे, राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेव्दारे विविध लाभार्थी घटकांना वितरित करण्यात येणाऱ्‍या अन्नधान्याच्या इष्टांकात सन २०१५नंतर सुधारणा करण्यात आलेली नाही. त्याशिवाय अनेक लाभार्थी घटक विविध कारणांमुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून गेल्या 4 वर्षात वगळले गेले आहेत. रेशन कार्ड फुटीमुळे (कुटुंब विभक्त होणे व इतर अन्य कारणे) राज्यातील लाखो कुटुंबे सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या लाभापासून वंचित झालेली आहेत. स्वस्त धान्य दुकानामार्फत देण्यात येणा-या लाभांपासून अशा विविध कारणांमुळे ५० लक्षापेक्षा अधिक कुटुंबे वंचित झाले आहेत. तर यासंदर्भात राज्य शासनाने तत्काळ धडक मोहिम हाती घेऊन या सर्व लाभार्थ्यांना पुन्हा स्वस्त धान्य दुकानामार्फत अन्नधान्य वितरणाचे लाभ सुरु करुन, सार्वजनिक वितरण व्यवस्थेत असलेल्या सर्व 5० लक्ष कुटुंबांचा समावेश तत्काळ करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी पक्ष विधिमंडळाचे अजित पवार, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व प्रदेशाध्यक्षाचे जयंत पाटिल यांनी केली आहे.

Protected Content