नागपूर वृत्तसंस्था | नुकतचं कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्या अनुषंगानं “बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या आणि रोज काँग्रेसची प्रतिमा मलिन करणाऱ्या नेत्याला प्रदेशाध्यक्षपदी ठेवू नये” अशी विनंती सोनिया गांधी यांना पत्रातून करणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.
यापूर्वीही राज्यात वध आणि हत्या या मुद्द्यावर मोठा गदारोळ झाला आहे. त्यात नाना पटोले यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल नाना पटोले यांनी असे वक्तव्य करू नये यासोबतच नाना पटोले यांनी मानसिक उपचार करून घ्यावेत, अशी टीका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटोले यांच्यावर केली. नागपूरमध्ये माध्यमांसोबत संवाद साधतांना चंद्रशेखर बावनकुळे हे बोलत होते.
त्याप्रसंगी त्यांनी नाना पटोले यांच्या सोबतच शिवसेना खासदार संजय राऊत आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका करत, “हे सरकार किराणा दुकानातून वाईन विक्री करण्याचे पाप लपवण्यासाठी मागच्या युती सरकारवर आरोप करत असल्याचे सांगत संजय राऊत सध्या बावचळले असून त्यांना काय बोलावं आणि कसं बोलावं याचं भान राहिलेलं असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.