ज्ञानगंगा माध्य.विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी

jamner school

जामनेर प्रतिनिधी । येथील ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नुकतीच गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.

विदयालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुलाब पुष्प व पेन अशी भेट दिली.
अध्यक्षीय भाषणात सोनवणे यांनी महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे मूलाधार होते. भारतीय संस्कृतीत गुरू-शिष्याच नातं फार महत्त्वपूर्ण आहे. गुरुपौर्णिमेच्या या दिवशी गुरूंची पूजा करतात. शिक्षक अंधारातून प्रकाशाकडे नेत असतो. याप्रकारे गूरु पौर्णिमेविषयी सविस्तर माहिती सांगण्यात आली. विनय खोंडे, विजय कोळी, योगेश बावस्कर, स्नेहल पाटील या शिक्षकांनी मनोगत व्यक्त करुन आभार मानले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आर.जे.सोनवणे व प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content