
जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव जिल्हा, तालुका आणि शहर कार्यकारिणीचा आढावा 12 ऑगस्ट रोजी घेण्यात आला. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेत, नव्या जबाबदाऱ्यांची घोषणा करण्यात आली. जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांनी पदाचा राजीनामा दिला होता, जो पक्षाने मंजूर केला असून, त्यानंतर जिल्हा, तालुका आणि शहर कार्यकारिण्या बरखास्त करून नवीन कार्यकारिण्यांची पुनर्रचना करण्यात आली आहे.
पक्षातील संघटनात्मक बळकटीसाठी जळगाव पश्चिम जिल्हा, तालुका व शहर स्तरावर नव्या कार्यकारिण्या गठित करण्यासाठी मुलाखती घेण्यात आल्या. या प्रक्रियेनंतर जळगाव पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची नवीन घोषणा करण्यात आली आहे.
जळगाव पश्चिम जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे : अध्यक्ष म्हणून ईश्वर पंडित पाटील, महासचिव अमोल कोल्हे, अॅड. रवींद्र ब्राम्हणे व अमिन मानखा तडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपद प्रविण जगन सपकाळे, संघटक गमिर शेख बाबू, उपाध्यक्ष अनिल पुंडलिक लोंढे, हरिचंद्र शंकर सोनवणे आणि मधुकर सुगदेव तांदळे हे असतील. याशिवाय विनोद बाबुराव बेरभेय्या, सचिव प्रितीलाल निंबा पवार आणि सल्लागार म्हणून प्रमोद रामदास इंगळे यांचा समावेश करण्यात आला आहे.
याचबरोबर जळगाव महानगर शहर कार्यकारिणीची घोषणाही करण्यात आली. शहर अध्यक्ष म्हणून ललितकुमार रामकिशोर घोगले यांची निवड झाली आहे. महासचिवपदी रमेश नामदेव चुनाडे (महाजन) तर उपाध्यक्ष म्हणून गणेश भिवसन महाले, प्रदिप उखरडू सोनावणे आणि विकास प्रकाश भालेराव, फारूक खान सलीम खान यांची निवड झाली आहे. संघटकपदी ऋषी प्रभाकर भारसके, प्रमोद मधुकर वाघ, अतुल पवार आणि प्रसाद मधुकर महाजन यांचा समावेश आहे. सचिव म्हणून प्रेमराज धनराज चौधरी, प्रसिद्धी प्रमुख राहुल शशिकुमार सुरवाडे, तसेच सदस्य म्हणून अक्षय लक्ष्मण अहिरे, संतोष मच्छीद्र कर्डीले, गणेश राजेंद्र जाधव, सुबोध मधुकर सपकाळे आणि सागर केदार या कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ही संपूर्ण कार्यकारिणी जळगाव जिल्ह्याचे महासचिव किसन चव्हाण यांनी अधिकृतरीत्या जाहीर केली आहे.
या नव्या संघटनांमुळे वंचित बहुजन आघाडीला जळगाव जिल्ह्यात नवे बळ आणि दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नव्या पदाधिकाऱ्यांकडून पक्षविस्तार आणि जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.



