पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नगरदेवळा (दिगर) येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे वाल्मिक पवार विजयी झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नगरदेवळा (दिगर) विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुक – २०२२ मध्ये वंचित बहुजन आघाडीचे नगरदेवळा गटाचे उप गट प्रमुख वाल्मीक रामचंद्र पवार यांचा प्रगती पॅनल मधुन ५०२ मतांनी दणदणीत विजय मिळविला. वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष विशाल बागुल, महासचिव दिपक परदेशी, उपाध्यक्ष सुनील कदम, तालुका प्रसिध्दी प्रमुख आकाश पवार, शहर उपाध्यक्ष शाकिब बागवान आदि पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित उमेदवार वाल्मीक रामचंद्र पवार यांच्या समवेत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून आशिर्वाद घेतले. त्यानंतर विशाल बागुल यांच्याहस्ते नवनिर्वाचित उमेदवार वाल्मीक पवार यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.