वैफल्यग्रस्त विरोधी पक्षनेत्याला ब्रेक लावणे कठीण : राऊत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सध्या सुरू असलेल्या राजकीय चिखलफेकीच्या पार्श्‍वभूमिवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे.

राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या उत्तर सभेत हल्लाबोल केल्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांना उत्तर दिले आहे. राऊत यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण असते. अपघात अटळ आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊतांनी सभेत देखील भाजपवर हल्लाबोल केला होता. शिवसेना कोणापुढे वाकणार नाही, ना कोणापुढे झुकणार नाही. आम्ही संघर्ष करत राहू, लढत राहू. आम्हाला संघर्षाची सवय आहे. आजची सभा शंभर सभांची बाप आहे. आजची सभा हेच सांगते की, मुंबईचा बाप शिवसेना फक्त शिवसेना आहे. कोणाला पाहायचं असेल, आजमवायचं असेल तर मुंबईत या. मुंबईचा बाप शिवसेना असून आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यानंतर त्यांनी आज पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केल्याचे दिसून आले आहे

Protected Content