वाहन आडवून चालकासह एकाला बेदम मारहाण 

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गुरांना बाजारात घेवून जात असलेल्या वाहनाला अडवून चालकासह एकाला १० ते १२ जणांनी बेदम मारहाण करून जबरदस्तीने पैसे हिसकाविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मेहुल सुनिल शिरसाठ (वय-२४) रा. धनगर गल्ली ता. चोपडा हे खासगी वाहन चालक आहेत. सोमवारी ९ मे रोजी सकाळी ५.३० वाजता ते कालू उखा चव्हाण यांच्या सोबत जामनेर येथील गुरांच्या बाजारात गुरे विक्री करण्यासाठी (एमएच १९ सीवाय ६९८४ ) ने जात होते. चोपडा ते धरणगाव दरम्यान साळगाव गावाजवळ १० ते १२ जणांनी रस्त्यावर वाहन आडवे लावून मेहुल शिरसाठ यांचे वाहन अडविले. मेहूल आणि कालू या दोघांना बेदम मारहाण करून त्यांच्या खिश्यातील ७ हजार २०० रूपये जबरी काढून नेल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी भैय्या माळी आणि त्यांच्यासोबत असलेले १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!