जामनेरात लसीकरण व गोठे फवारणी

जामनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सध्या सर्व दूर लम्पी आजारामुळे पशुधन आजारी पडत असून यासाठी खबरदारी म्हणून लम्पी आजार होऊ नये, यासाठी जामनेर नगरपालिकेतर्फे विविध उपायोजना केल्या जात असून त्यापैकी जामनेर शहरातील जनावरांचे सर्व गोठे जंतुनाशक फवारणी केली जात आहे.

त्याचबरोबर शहरातील सुमारे दीड हजार गुरांना लसीकरण करण्यात आले आहे. सदर गोठे फवारणीच्या वेळी नगरपालिका उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी सचिव जितेंद्र पाटील, नगरपालिका मुख्य अधिकारी चंद्रकांत भोसले, नगरसेवक बाबुराव हिवराळे, फारूक मणियार, उपमुख्य अधिकारी दुर्गेश सोनवणे, स्वच्छता अधिकारी सुरज पाटील, गजानन माळी आदी नगरसेवक व नगरपालिका कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content