देश हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर नाही – अरुणा ढेरे

Aruna Dhere

मुंबई, वृत्तसंस्था | देश कुठल्याही हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर नाही, असे स्पष्ट मत साहित्य संमेलनच्या माजी अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले आहे. शुक्रवारी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांनी JNU मधल्या हिंसाचारावर बोट ठेवत देश हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर उभा आहे, असे वक्तव्य केले होते.

याबाबत आज साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी देशात अशी काहीही परिस्थिती नाही, असे मत व्यक्त केले आहे. आपण सगळे सुजाण नागरिक आहोत, आपण का अशा हिटलरशाहीच्या मागे जाऊ ? असे म्हणत त्यांनी साहित्यिकांवर कोणताही दबाव नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

“साहित्य आणि समाज यामधल्या बदलांबाबत ९३ व्या संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो हे फारसं काही बोलले नाहीत. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिब्रेटो यांनी दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्यांचा विषय त्यांनी भाषणात घेतला होता. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून ते निरनिराळ्या विषयांवर ते तळमळीने बोलले. ती तळमळ खरी होती. सध्या देशात घडणाऱ्या काही गोष्टींचे पडसाद हे संमेलनात उमटणे स्वाभाविक होते तसे ते उमटले. मात्र साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर साहित्याबाबत बोलण्यापेक्षा या पडसादांवर जास्त भाष्य करण्यात आले.”

Protected Content