नवी दिल्ली । रेल्वे बोर्डात पहिल्यांदाच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ पद निर्मित करण्यात आली असून यावर व्ही. के. यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनाच मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी करण्यात आले आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती प्रकरण समितीने या नियुक्तीस मान्यता दिली आहे. रेल्वेच्या इतिहासात प्रथमच सीईओ पदाची निर्मिती झाली असून यादव अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारतील.
यादव यांना रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तर प्रदीप कुमार (इन्फ्रास्ट्रक्चर), पीसी शर्मा (ट्रॅक्शन अँड रोलिंग स्टॉक), पीएस मिश्रा यांना ऑपरेशन्स अँड बिझिनेस डेव्हलपमेंट आणि मंजुला रंगराजन (वित्त) यांना सदस्य म्हणून नेमण्यात आले आहे.
दरम्यान, रेल्वे मंडळामधील सदस्य (कर्मचारी), सदस्य (अभियंता व सदस्य), (मटेरियल मॅनेजमेंट) ही तीन पदे रद्द करण्यात आली आहेत.