Home क्राईम उत्राण येथील वयोवृध्दाची गळफास घेवून आत्महत्या

उत्राण येथील वयोवृध्दाची गळफास घेवून आत्महत्या

0
106

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील उत्राण येथील ७३ वर्षीय वयोवृध्दाने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संतोष माधवराव कोळी (वय-७३) रा. उत्राण ता. एरंडोल असे मृत वयोवृध्दाचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष कोळी हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविवारी ३ जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या पुर्वी राहत्या घरातील लोखंडी अँगलला नायलानच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घडली आहे. दरम्यान घरचे कुटुंबियांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने एरंडोल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound