Home क्राईम महिलेच्या घरावर दगडफेक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

महिलेच्या घरावर दगडफेक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0
102

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । काहीही कारण नसतांना घरावर दगडफेक केल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेला शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार तांबापूरा येथील नाथवाडा परिसरात घडला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हमीदाबी शेख तस्लिम (वय-४५) रा. दत्त मंदीराजवळ, नाथवाडा, तांबापूरा या महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविवारी ३ जुलै रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास पिन्या (पुर्ण नाव माहित नाही) यांच्यासह अनोखळी एक यांनी हमीदाबी या घरात झोपलेले असतांना घरावर दगडफेक केली. हमीदाबी व तिचे मुले बाहेर येवून पाहिले असता पिन्यासह अनोळखी एकजण दिसून आला. त्यांनी दगडफेक का करता असा जाब विचारल्याने तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या अशी धमकी दिली व पसार झाले. रविवारी ३ जुलै रोजी दुपारी महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound