रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिद्दीने आणि चिकाटीने अभ्यास केल्यास नक्कीच यश मिळेल. “शिक्षण हेच यशाचे खरे साधन आहे” विद्यार्थ्यांना आपल्या ध्येयाच्या दिशेने सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा सल्ला दिला. डी. एन. कॉलेजमध्ये आयोजित एका कार्यक्रमात आयपीएस अन्नपूर्णा सिंह यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जीवनातील यशाच्या वाटचालीबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना सांगितले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी होते.
आजच्या डिजिटल युगात, सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, अन्नपूर्णा सिंह यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा उपयोग सकारात्मक आणि विधायक कामांसाठी करण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, सोशल मीडियाचे पासवर्ड कोणालाही देऊ नयेत आणि कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते, असेही त्यांनी सांगितले.
लैंगिक छळाच्या मुद्द्यावर त्यांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले. अशा घटनांपासून सावध राहणे आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सजग राहणे किती आवश्यक आहे, याबद्दल त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.त्यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या शारीरिक किंवा मानसिक त्रासाला तोंड देताना धाडसाने वागण्याचा आणि योग्य ते पाऊल उचलण्याचा सल्ला दिला.कोणाचा त्रास होत असेल किंवा त्रास देत असेल तर अश्या तक्रारी निर्भय होऊन पोलिस प्रशासनाला कळवण्याचे अवाहन केले.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणातच नव्हे, तर जीवनातील इतर क्षेत्रांमध्येही सजगतेने आणि जबाबदारीने वागण्याची शिकवण घेतली पाहिजे. आयपीएस अन्नपूर्णा सिंह यांच्या या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांनी बोध घेऊन आपल्या आयुष्यात योग्य दिशा निवडावी,अशी अपेक्षा कॉलेज प्राचार्य प्राध्यापक यांनी व्यक्त केले आहे.