काँग्रेसचे उमेदवार शिरीष चौधरी यांनी प्रचार दौऱ्यात साधला ग्रामस्थांशी संवाद

shirish chaudhari news

फैजपूर प्रतिनिधी । रावेर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार माजी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांचे आज रविवारी दि.६ रोजी प्रचाराला प्रारंभ झाला. माजी आ.चौधरी यांनी दुपारी आमोदा, बामणोद, कोसगाव, वनोली या चार गावांमध्ये सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रचार फेरी काढून ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी माजी आमदार रमेशदादा चौधरी, जि.प. गटनेता प्रभाकर सोनवणे, लिलाधर चौधरी, एस.के.चौधरी, एम टी फिरके, पं.स.गटनेता शेखर पाटील, योगेश भंगाळे, बापू पाटील, किशोर बोरोले, माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे यांच्यासह आघाडीच्या कार्यकर्त्यांचा,ग्रामस्थांचा स्वयंस्फूर्तीने उत्स्फूर्त सहभाग होता.

दरम्यान आमोदा गावी सरपंच राहुल तायडे, माजी सरपंच राजू पाटील, मोहन लोखंडे, महेश आमोदकर, बामणोद येथे एकविरा माता मंदिर येथे शिरिषदादा यांच्या हस्ते नारळ वाढविण्यात आले. प्रचार फेरी दरम्यान बामणोद गावात ठिकठिकाणी शिरिषदादा यांचे औक्षण करून फुलांच्या पाकळ्यांनी स्वागत करण्यात आले. यावेळी शिवराम किसन तायडे, गोपाळ रामदास फिरके, प्रभाकर दौलत झोपे,प्रमोद अशोक बोरोले, प्रवीण मधुकर नेहेते, नामदेव दामू झोपे, गिरीधर रावजी बोंडे, घनश्याम टिकाराम नेहेते,नितीन एकनाथ झोपे,माजी पं स सद्स्य विलास तायडे यांच्यासह ग्रामस्थ प्रचार फेरीत सहभागी झाले होते. दरम्यान कोसगाव येथे प्रचारादरम्यान साई मंदिर येथे दर्शन घेऊन नवमीच्या भंडाऱ्याला  शिरिषदादा चौधरी यांनी भेट दिली. यानंतर वनोली गावी प्रचारात माजी सरपंच मधुकर पाटील, डॉ.प्रमोद इंगळे, विठ्ठल यादव चौधरी, किसन सपकाळे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Protected Content