मोटारसायकलला अज्ञात वाहनाची धडक ; २ जखमी ( व्ही डी ओ )

 

यावल  : प्रतिनिधी । यावल – भुसावळ मार्गावर मोटरसायकल व अज्ञात ट्रकच्या अपघातात दोन जणं जखमी झाले

 

अज्ञात ट्रकचालक त्याचे  वाहन घेवुन पसार झाला आहे . यावल ते भुसावळ मार्गावरील जुने भुसावळ नाक्यावर  आज  सकाळी यावलहुन भुसावळकडे  मोटरसायकलने  ( क्र  एमएच १९ बी २१८o ) यावल येथील आठवडे बाजार परिसरात  राहणारे  शेख शकील शेख ईबा ( वय ४७ ) व  दहिगाव येथील मेहमुद खान फकीरा खान ( वय ५२ ) हे दोघ ही बांधकाम कारागीर  जात होते

 

भुसावळकडुन यावलच्या दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने भरधाव वेगात  मोटरसायकलला धडक दिल्याने हे दोघे जखमी झाले यातील एकाची प्रकृती गंभीर आहे . अपघात झाल्यानंतर ट्रकचालक पुन्हा भुसावळच्या दिशेने पसार झाला   या जखमींना  यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय अधिकारी डॉ . शुभम तिळके , अधिपरिचारिका निलीमा पाटील , आरोग्यसेवक कादर तडवी यांनी प्रथमोपचार केल्यावर दोघांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले आहे . प्रहारचे राजु शेख , नगरसेवक मनोहर सोनवणे , हाजी अय्याज खान , अशपाक शाह  यांनी या जखमींवरील उपचारांसाठी  मदत केली.

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/272376784694213

Protected Content