धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील मोठा माळी वाडा परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचे रात्रीच्या वेळी महिलांनी स्वत:हून अचानक सुरुवात केली, विशेष म्हणजे आज सकाळी या स्वच्छतागृहाचे उद्घाटन होणार होते.
धरणगाव मोठा माळीवाडा परिसरातील शेतकरी वर्ग असल्यामुळे रोज सकाळी उठून शेतात कामाला जावे लागते. अनेक दिवसापासून त्यांना शौचास उघड्यावर बसावे लागत होते. धरणगाव नगर परिषदकडे वारंवार तक्रार करून देखील नगरपालिका प्रशासनाने यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. या प्रकरणी काही दिवसांपूर्वीच सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळने पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते. यावेळी त्यांनी दोन दिवसात कुलूप खोलून करा नाही तर, आम्ही खोलू असा दम प्रशासनाला दिला होता. भाजपने देखील याबाबत निवेदन देत शौचालय सुरु करण्याची विनंती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. यानंतर सोमवारी रात्री अचानक परिसरातील महिला आक्रमक झाल्या. या त्रस्त महिलांनी शेवटी स्वत: जाऊन कुलूप तोडून आपला निर्णय घेतला आणि शौचालय सुरु केले.
विशेष बाब म्हणजे आज सकाळीच या शौचालयाचे विधीवत उदघाटन करण्यात येणार होते. या आधीच महिलांनी याचा ताबा घेतल्याने शहरात चर्चेला एकच उधाण आले आहे.