उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा


मुंबई (वृत्तसंस्था) प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

 

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी लोकसभा निवडणुकांदरम्यान काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांना पक्षाने उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. पण त्यांचा निवडणुकीत पराभव झाला होता.उर्मिला यांनी असं म्हटलं आहे की, ‘जेव्हा मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलींद देवरा यांना मी १६ मे रोजी पाठवलेल्या पत्रावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, तेव्हा पहिल्यांदा माझ्या मनात राजीनाम्याचा विचार आला. या पत्रातील गोपनीय माहिती नंतर सोयीस्करपणे माध्यमांना पुरवण्यात आली. मी याचा वारंवार निषेध करूनही पक्षातील कोणीही माफी मागण्याचीही तसदी घेतली नाही. या पत्रात ज्यांची नावे होती त्या उत्तर मुंबईतील काही जणांना त्यांच्या निवडणुकीतल्या वाईट कामगिरीबाबत जाब विचारण्याऐवजी नवी चांगली पदे देण्यात आली. यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण असल्याचे तिच्या लक्षात आले. काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत असले तरीही राजकारण सोडणार नाही असे उर्मिलाने म्हटले होते. तरीही उर्मिला अवघ्या 4 ते 5 महिन्यांतच राजकारणापासून हात लांब केले.

Protected Content