मुंबई प्रतिनिधी । अभिनेत्री उर्मीला मातोंडकर यांनी मातोश्रीवर हातावर शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून उर्मीला मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू होती. याला कुणीही दुजोरा दिला नव्हता. तथापि, आज दुपारी अखेर त्या शिवसेनेत दाखल झाल्या आहेत. त्यांनी २०१९ साली काँग्रेसमध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढविली होती. तथापि, यात त्यांना अपयश आले होते. भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला होता. यानंतर त्या काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा होती. यांनंतर आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या पार्श्वभूमिवर, उर्मिला मातोंडकर यांनी आज दुपारी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्रीवर पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सौभाग्यवती रश्मी ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले. उर्मीला यांना राज्यपालनियुक्त कोट्यातून विधानपरिषद सदस्या होणार असल्याची चर्चा आहे. याआधी त्यांनी हाती भगवा झेंडा हाती घेतला आहे.