बांधकाम कामगार महासंघ शाखा फलकाचे अनावरण

चाळीसगाव  प्रतिनिधी । येथील पंचशील नगर येथे भारतीय मजदूर संघ संलग्न बांधकाम कामगार महासंघ शाखा फलकाचे अनावरण आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस पंचशील नगर येथील भिम स्तंभ व जगन्नाथ स्वामी मंदिर येथे पूजन करून फलकाचे अनावरण आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक तथा भाजप शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, ऍड धनंजय ठोके, आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत कदम, प्रशिक कदम, प्रतीक पाटील, जितेंद्र पाटील, नितीन पाटील, विजय जाधव, सुबोध वाघमारे, सदाशिव सोनार, सत्यजित पाटील, तुषार पाटील, उपस्थित होते.

आमदार मंगेशदादा चव्हाण व उपस्थित मान्यवर यांचा सत्कार प्रकाश खरात, जावेद सैय्यद, संजय रणधीर, राजू कदम, नितीन पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार श्री चव्हाण म्हणाले की शासनाकडे कामगारांसाठी अनेक योजना आहेत या योजना कामगार बांधवाना मिळवून देईल व सदैव कामगारांच्या सोबत राहील कामगारांच्या ज्या समस्या असतील त्या मी सोडवेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यावेळी राहुल रणधीर, सत्तार मलिक, पंकज कदम, अक्षय सरोदे, अनिकेत रणधीर, आशुतोष खरात, रोहित कदम, भैय्या निकम, यशोदीप रणधीर, रोहित शिंदे, सिद्धांत पवार, रोहित सरोदे, मयुर कदम, आदित्य रणधीर, जयेश खरात, सम्यक पवार, साहिल शेख, सलमान शेख, अनु सरोदे, रितेश खरात, कुणाल कदम, दिलीप गरुड तरवाडे येथील सचिन पवार, सतीश चौधरी, आरिफ तांबोळी, रवींद्र गायकवाड, योगेश गायकवाड, पुनमचंद राठोड, रशीद शेख, दिगंबर मीस्तरी आदी कामगार उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!