पाचोरा नंदू शेलकर । मागील वर्षी तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हेरावुन घेतला. प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई त्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे. परंतु, नुकसान भरपाई म्हणून खडकदेवळा येथील शेतकऱ्याच्या बँक खात्यात केवळ २७० रुपये जमा झाले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बु” येथील शेतकरी अरुण विश्राम पाटील यांनी सन – २०१९ / २० मध्ये त्यांच्या मालकीच्या गट क्रं. ५७ या शेतात २ एकर मक्याची पेरणी केली होती. मका पिकास खते, बि -बियाणे देवुन मका काढणीला आला असतांनाच हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी अतिवृष्टीमुळे निसर्गाने हेरावुन नेला. यावेळी शासनाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रशासनास सुचना दिल्या होत्या. संबंधित कर्मचाऱ्यांनी पंचनामे करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला. गेल्या महिन्या पासुन शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई त्यांचे बॅंक खात्यात जमा होत आहे. मात्र अरुण पाटील यांच्या बॅंक खात्यात अतिवृष्टीचे केवळ २७० रुपये जमा झाल्याने अरुण पाटील हे योग्य नुकसान भरपाई मिळण्यापासुन वंचित राहिल्याने अरुण पाटील यांनी तहसिलदार कैलास चावडे यांना याबाबत लेखी पत्र देवुन योग्य नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/157485033142120