फळ पिक विमा प्रणाली दुसऱ्या जागी हलविण्याबाबत निवेदन

यावल प्रतिनिधी । येथील कृषी विभागाअंतर्गत येणाऱ्या हवामानावर आधारित फळ पिक विमा प्रणाली दुसऱ्या जागी हलविण्याच्या निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रावेर लोकसभा विभागाचे जनहित जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांच्या वतीने तालुका कृषी अधिकारी यांना निवेदनाव्दारे केली आहे.

या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांनी यावल तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांना  दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल तालुक्यातील हवामान खात्याची यंत्रणा ही सदोष असुन, वेधशाळेची जागा ही चुकीची असुन हवामानावर आधारीत फळ पिक विमा यावल तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाच्या आवारात असुन त्याच क्षेत्रात बसविले. त्या क्षेत्रात अन् परिसरात अनेक प्रकारची वृक्ष आणी गवत मोठ्या प्रमाणावर आहे. त्या ठीकाणी हवामानातील तापमान योग्य त्या प्रकारे मोजमाप होतांना दिसुन येत नाही. त्यामुळे यावल तालुक्यातील महसुल मंडळाच्या माध्यमातुन संकटात आलेल्या शेतकऱ्यांवर हा मोठा अन्याय होतांना दिसत आहे. तरी शासनाने येथील हवामानावर आधारीत फळ पिक विमा यंत्रणा ही तात्काळ दुसऱ्या ठिकाणी लवकरात लवकर हलविण्यात यावी व त्यात योग्य त्या शेतकऱ्यांच्या हितासाठी सुधारणा करणे अपेक्षीत असुन तसे न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुक्यातील शेतकरी बांधवांना सोबत घेवुन आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर, मनसे तालुका उपाध्यक्ष शाम पवार , मनसेचे शहराध्यक्ष किशोर नन्नवरे , शहराध्यक्ष विद्यार्थी सेना गौरव कोळी , विभाग अध्यक्ष आबीद कच्छी, विपुल येवले, प्रतिक येवले, विनोद शिंपी यांच्या स्वाक्षरी आहे.

Protected Content