जामनेर प्रतिनिधी | तालुका प्राथमिक विविध कार्यकारी सहकारी संस्था, छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्था मर्यादित संस्थेच्या चेअरमनपदी सुरेश मन्साराम पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी त्यांचा सत्कार भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी केला.
नुकतीच माजी मंत्री आमदार गिरीश महाजन व माजी खासदार राष्ट्रवादीचे नेते ईश्वरलाल जैन यांनी संयुक्तरीत्या ‘सहकार पद्धत पॅनल’च्या माध्यमातून संघाची निवडणूक लढवली होती व सर्व जागा निवडून आल्या होत्या.
गुरुवार, दि.१३ जानेवारी रोजी ‘देखरेख संघा’च्या चेअरमनपदाची निवड करण्यात आली. यात डॉ.सुरेश मन्साराम पाटील यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीबाबत आमदार गिरीश महाजन व माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी अभिनंदन केले.
या निवडी दरम्यान ‘देखरेख संघा’चे संचालक अॅड. ज्ञानेश्वर बोरसे, मिठाराम धनगर, रवींद्र हेगडे, विकास महाजन, शामकांत पाटील, विश्वनाथ पाटील, विठ्ठल पाटील, आशाबाई पाटील, सुनंदा पाटील, तुकाराम निकम, जि प सदस्य विलास पाटील, उपनगराध्यक्ष शरद पाटील, अशोक भोईटे आदींनी नवनिर्वाचित चेअरमन व संचालकांचा मंडळाचे अभिनंदन केले.