जिल्हा दुध उत्पादक संघ कर्मचारी व कामगार निधी संचालक मंडळाची बिनविरोध निवड    

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा दुध उत्पादक संघाचे कर्मचारी व कामगार निधी प्रतिष्ठाण, जळगांवची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया आज संपन्न झाली. यात यात अध्यक्षपदी मदन चोपडे तर उपाध्यक्षपदी निलेश ब्रम्हे यांच्यासह संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली.

जिल्हा दुध उत्पादक संघ कामगार सुविधा भवन, जळगांव येथे आज मंगळवार, दिनांक १७ मे २०२२ रोजी जिल्हा दुध उत्पादक संघाचे कर्मचारी व कामगार निधी प्रतिष्ठाण, एफ- ७०९ /जळगांव या न्यासाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणूक कार्यक्रमानुसार सन मे २०२२ ते एप्रिल २०२७ या कालावधीकरीता कार्यकारी मंडळाची बिनविरोध निवड झाल्याचे घोषीत करण्यात आले. जिल्हा दुध उत्पादक संघाचे कर्मचारी व कामगार निधी प्रतिष्ठाण, जळगांव यांनी घोषणा पत्राद्वारे या संदर्भात माहिती दिली.

 

बिनविरोध निवड झालेले उमेदवार व पदं खालीलप्रमाणे –

 

अध्यक्ष – मदन जगन्नाथ चोपडे

उपाध्यक्ष – निलेश श्रावण ब्रम्हे

सेक्रेटरी – विश्वास मधुकर विंचुरकर

खजिनदार – मंगेश जगन्नाथ पाटील

सदस्य –

रवि शिवाजीराव वानखेडे

सुनिल दशरथ पाटील

सुदेशना गोपाळ महाजन

 

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. डी. मेश्राम यांनी काम पाहिले.

Protected Content