दुचाकी घसरल्याने एक गंभीर जखमी

download 2

जळगाव प्रतिनिधी । बोदवड ते चिंचखेंडा येथे कामानिमित्त दुचाकीने जात असतांना दुचाकी घसरल्याने 55 वर्षीय प्रौढ गंभीर जखमी झाले. जखमीस उपचारार्थ जिल्हा शासकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जगदीश धानसिंग पिंपळे (वय-55) रा. नशिराबाद हे काही कामनिमित्त बोदवडमार्गे चिंचखेडाकडे जात असतांना रस्त्यावर दुचाकी घसरल्याने डाव्या कानाला गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आले. याबाबत जिल्हा पेठ पोलीसात नोंद करण्यात आली आहे.

Protected Content