कर्नाटकातील पेच कायम; मुख्यमंत्री बदलाचे वारे

बंगळुरू वृत्तसंस्था । कर्नाटकात काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्या सत्रानंतर नवीन टर्न आला असून मुख्यमंत्री बदलासाठी हे दबावतंत्र वापरण्यात आल्याची बाब समोर आली आहे.

काँग्रेस व जेडीएसच्या एकूण १३ आमदारांनी आपल्या पदाचे राजीनामे सभापतींकडे सुपुर्द केल्यानंतर हे आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. यातील काँग्रेसच्या आमदारांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या जागी सिध्दरामय्या यांना मुख्यमंत्री केल्यास आपण राजीनामे मागे घेऊ असा पवित्रा घेतला आहे. यामुळे कुमारस्वामी यांना बदलण्यासाठी हे दबावतंत्र तर नव्हे अशी चर्चा सुरू झाली आहे. तर काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांचे नावदेखील मुख्यमंत्रीपदासाठी समोर आले आहे. कुमारस्वामी हे लवकरच विदेशातून येत असून ते आल्यानंतर कर्नाटकातील राजकीय पेचप्रसंगाला नेमका कोणता टर्न मिळतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

Protected Content