ब्रेकींग : वराड-जळके रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून एकाला लुटले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी  । तालुक्यातील वराड-जळके रस्त्यावर एका खाजगी बँक व्यवस्थापकाची दुचाकी अडवून अज्ञात तीन जणांनी चाकूचा धाक दाखवत अंदाजे १ लाख रूपयांची रोकड असलेली बॅग जबरी हिसकावून लंपास केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे.

 

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका खाजगी बँकेचे बँक व्यवस्थापक हे तालुक्यातील वराड, बांबरूळ, जळके, विटनेर सह इतर गावातून पैशांची वसुली करून दुपारी ३ वाजेच्या सुमारास वराड-जळके दरम्यानच्या रस्त्याने दुचाकीने जात होते. त्यावेळी अज्ञात तीन जण दुचाकीवर येवून बँक व्यवस्थापकाच्या दुचाकीसमोर आडवी लावली. त्यात बँक व्यवस्थापक दुचाकीसह खाली पडले. अज्ञात तिघांपैकी दोन जणांनी बँक व्यवस्थापकाच्या हातातील रोकडची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. बँक व्यवस्थापकाने आपली सोबत असलेली बॅग सोडली नाही, त्यामुळे एकाने हातातील चाकूने बोटावर वार केला व हातातील अंदाजे एक लाख रूपयांची रोकडची बॅग हिसकावून पसार झाले.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधिक्षक कुमार चिंता, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील चौकशीचे काम सुरू आहे. दरम्यान यापूर्वी दीड महिन्यापूर्वी देखील याच परिसरात अश्याच पध्दतीने अज्ञात तीन जणांनी चाकूचा धाक दाखवून पैशांची बॅग लांबविल्याची घटना घडली होती. अद्यापपर्यंत गुन्ह्यातील आरोपींचा शोध लागलेला नसतांना ही दुसरी घटना घडली आहे.

Protected Content