उन्नाव बलात्कार प्रकरण : सेंगरला जन्मठेप

Kuldeep Sanger guilty in Unnao rape case

 

दिल्ली वृत्तसंस्था । संपूर्ण देशभरात गाजलेल्या उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपचे निलंबित आमदार कुलदीप सेंगर याला हजारी कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असून कोर्टाने सेंगर याला पीडितेला २५ लाख रुपयांची भरपाई देण्याचेही आदेश दिले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सेंगरला कोर्टाने १६ डिसेंबरला भादंवि ३७६, पॉक्सो कायद्यातील कलम ५ (सी) अंतर्गत दोषी ठरवले होते. उन्नाव येथे २०१७मध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणात आमदार कुलदीपसिंग सेंगर दोषी असल्याचे स्पष्ट झाले. दिल्लीमधील तीस हजारी न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे. यावेळी न्यायालयाने कुलदीप सिंह सेंगरला पीडितेला २५ लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला आहे. यावेळी १९ डिसेंबरला शिक्षेवर सुनावणी करणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार न्यायालयाने कुलदीप सिंह सेंगरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Protected Content