पुन्हा खुनाने हादरले जळगाव : हल्ल्यात जखमी तरूणाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरात काल रात्री उशीरा प्राणघातक हल्ला करण्यात आलेल्या तरूणाचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, शहरातील खोटेनगर परिसरात काल रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एका तरूणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील रहिवासी असलेल्या अविनाश निंबा अहिरे ( वय ३५) हा तरूण यात गंभीर जखमी झाला होता. या हल्ल्याचे नेमके कारण समजले नसले तरी पूर्व वैमनस्यातून हे कृत्य घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या अविनाश निंबा अहिरे यांना रात्रीच जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथेच उपचार सुरू असतांना आज पहाटे त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात एकच आक्रोश केला. यामुळे या हल्ल्यात आता खुनाचे अर्थात कलम-३०२ लावण्यात येणार असल्याचे समजते. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Protected Content