उन्मेष पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल

जळगाव प्रतिनिधी । जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी आज आमदार उन्मेष पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

आमदार उन्मेष पाटील यांना कालच पक्षातर्फे कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले होते. तर रात्री उशीरा त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. या अनुषंगाने आज सकाळी आमदार उन्मेष पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी ना. गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात भाजप व शिवसेना युतीची बैठक झाली. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील, आमदार शिरीष चौधरी, राजूमामा भोळे, चंद्रकांत सोनवणे, चंदूभाई पटेल, माजी आमदार डॉ. गुरूमुख जगवाणी, किशोर काळकर आदींसह भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर आ. उन्मेष पाटील यांनी आपली उमेदवारी दाखल केली. याप्रसंगी स्मिता वाघदेखील उपस्थित होत्या.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी वाघ दाम्पत्याची समजूत काढली. ते म्हणाले की, आपण प्रामाणिकपणे काम केले असून आता तिकिट कापले तरी याचा राग न मानता कामाला लागा असे आवाहन त्यांनी केले. तर युतीच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान व्हावे यासाठी झटून कामाला लागण्याचे आवाहन केले. यानंतर आमदार उन्मेष पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज सादर केला.

Add Comment

Protected Content