जळगाव प्रतिनिधी । खासदार उन्मेष पाटील यांची भारत सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस समितीवर निवड करण्यात आली आहे.
खासदार उन्मेषदादा पाटील हे केमिकल इंजिनियर असून त्यांची आता केंद्र सरकारच्या पेट्रोलीयम आणि नैसर्गिक गॅस समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना समिती वर जेष्ठ खासदार ओमप्रकाश माथूर यांच्यासह अनुभवी खासदारांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. याबाबत खासदार उन्मेष पाटील भावना व्यक्त करताना सांगितले की एक केमिकल इंजिनियर असलेल्या समाजकारणातून राजकारणात काम करणार्या युवकाला आधी आमदार व खासदार म्हणून जनतेने संधी दिली. अतिशय महत्वाच्या केंद्रीय समिती वर काम करताना देशात आणि देशाबाहेर तसेच उद्योग, धोरण व आर्थिक विकास याबाबत काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे. या कंपन्या मध्ये असलेल्या सामाजिक दायित्व निधी अर्थात सीएसआर च्या माध्यमातून विकासाचा वेगळा प्रयोग करता येईल. मला सेवेची संधी दिल्याने आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो अशी भावना खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केली आहे.