…भाजपचे आंदोलन म्हणजे चमकोगिरी- देवेंद्र मराठे (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । आज जिल्हा कोविड रूग्णालयातील महिलेच्या भयंकर मृत्यूला जेवढे अधिकारी कारणीभूत आहेत तितकेच लोकप्रतिनिधी देखील जबाबदार असल्याचा आरोप एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणावरून आंदोलन करणार्‍या भारतीय जनता पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

जिल्हा कोविड रूग्णालयातील महिलेच्या बाथरूममधील मृत्यूने प्रचंड खळबळ उडाली आहे. या अनुषंगाने एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे. यात ते म्हणाले आहेत की, आज जळगाव शहरातील कोविंड रुग्णालयांमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार निदर्शनास आला.
गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेली ८२ वर्षीय वृद्ध महिलेचा आज सकाळी कोविड रुग्णालयाच्या बाथरूममध्ये मृतदेह आढळून आला.
जळगाव जिल्ह्यातील ही अत्यंत दुःखद अशी घटना आहे
परंतु या घटनेला जबाबदार असलेले प्रशासना मधील अधिकारी व तेवढेच जबाबदार जळगाव शहराचे व जिल्ह्याचे अकार्यक्षम लोकप्रतिनिधी आहेत. आज जळगाव शहरातील कोवीड रुग्णालयांमध्ये झालेल्या धक्कादायक प्रकाराचा भाजप पक्षाच्या वतीने शहराचे सर्व लोकनियुक्त लोकप्रतिनिधी म्हणजेच आमदार,महापौर यांच्यासह नगरसेवक व इतर पदाधिकार्‍यांनी व कोवीड रुग्णालयामध्ये जाऊन प्रशासनाच्या अधिकार्‍यांच्या विरोधात लाजिरवाणे असे चमकोगीरी निषेध आंदोलन केले.
शहरातील कोवीड रुग्णालयांमधील दररोजच्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्याचे काम लोकप्रतिनिधींचा असत, त्यामुळे आज चमकोगिरी आंदोलन करण्यापेक्षा जर शहराच्या आमदारांनी दररोज कोवीड रुग्णालयांमध्ये जाऊन तेथे सुरू असलेल्या कारभाराचा आढावा घेतला असता तर आज या वयोवृद्ध महिलेला आपला जीव गमवावा लागला नसता असा टोला त्यांनी मारला आहे.

देवेंद्र मराठे पुढे म्हणाले की, ज्या शहरातील नागरिकांनी आमदार व महापौर व नगरसेवक या सर्वांना भरघोस मतांनी निवडून दिले असताना देखील प्रशासनावर व अधिकार्‍यांवर वचक ठेवण्याचे काम हे या लोकप्रतिनिधीचे असताना देखील हे फक्त चमकोगिरी करण्यासाठी एक लाजिरवाणी निषेध आंदोलन करण्याचा प्रयत्न आज भाजपच्या वतीने करण्यात आला.

जळगाव जिल्ह्याला असलेले दोन खासदार जळगाव लोकसभा व रावेर लोकसभेचे ( निवडणुकीनंतर कायम बेपत्ता असलेल्या) तसेच जळगाव शहरांमधील लोकनियुक्त आमदार महापौर व नगरसेवक हे सर्व भाजप पक्षाचे आहेत.
जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा आखुन देण्याचं काम हे राज्य सरकारचे असल्यामुळे राज्य सरकार नंतर जिल्ह्यातील ा यंत्रणेचा योग्य तो वापर प्रशासकीय अधिकार्‍यांकडून करून घेण्याचं प्रमुख काम हे नागरिकांनी निवडून दिलेल्या या लोकप्रतिनिधींच असतं.
परंतु जेवढे प्रशासनातील अधिकारी अकार्यक्षम आहेत तेवढेच सत्तेचे भुखे असलेले हे भाजपाचे लोकप्रतिनिधी सुद्धा आहेत.
त्यामुळे यांना फक्त राज्यांमध्ये जेव्हा सरकार असतं तेव्हाच हे लोकप्रतिनिधी रस्त्यावरती दिसतात परंतु आता राज्यांमध्ये सरकार नाही त्यामुळे भाजपाचे हे सर्व लोकप्रतिनिधी घरात लपून बसलेले आहेत
त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या कोरोणाच्या पार्श्‍वभूमीवर या उडालेल्या भडक्याला जबाबदार असलेले जिल्हा प्रशासनाच्या अधिकार्‍यांसह जळगाव जिल्ह्यातील हे लोक प्रतिनिधी सुद्धा आहेत असा आरोप देवेंद्र मराठे यांनी केला आहे. यासोबत त्यांनी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या प्रशासकीय अधिकार्‍यांसह या सर्व लोकप्रतिनिधींचा जाहीर निषेध केला आहे.

खालील व्हिडीओत पहा देवेंद्र मराठे यांची भाजपवरील जोरदार टीका !

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2678560919134991

Protected Content